अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांमुळे महाराष्ट्रात १,००,००० मराठा उद्योजक संख्या पूर्ण
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०९/२०२४- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात १,००,००० मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली व महामंडळाचे १,००,००० लाभार्थी उद्योजकांची संकल्पपूर्ती झाली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत १,०७२१३ लाभार्थी झाले असून, ८९९० कोटी रुपये विविध बँकानी कर्ज वितरित केले आहे व त्यापैकी महामंडळाने ८६७ कोट रुपये व्याज परतावा केला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यात १०१८४ लाभार्थी झाले असून ८१५ कोटी रुपये विविध बँकानी कर्ज वितरित केले आहे व त्यापैकी महामंडळाने ७ कोटी पेक्षा जास्तीचा व्याज परतावा केला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजने अंतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या बँकांचा सत्कार तसेच नाविन्यपूर्ण व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी रेस्ट हाऊस पंढरपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी सर्व मंत्री महोदय याचबरोबर शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, नॅशनल बँक,खाजगी बॅंक व सहकारी बँकांचे प्रमुख,महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी कर्मचारी,लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधीतांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्याचेही आभार व्यक्त केले आहेत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रात १,००,००० मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली. त्यानिमित १०००००० मराठा उद्योजक जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने आयोजित केला आहे.
सदरील मेळावा व उपकेंद्र उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होणार आहे. दि २९/०९/ २०२४ रोजी उपकेंद्र उदघाटन सकाळी १० वा. ठिकाण हॉल क्र.७, इंदिरा गांधी चौक, शॉपिंग सेंटर, लोकमंगल बँकेच्या शेजारी, पंढरपूर व मेळावा सकाळी १०:३० वा ठिकाण श्रीयश पॅलेस,आटपाडी रोड, पंढरपूर या ठिकाणी घेण्याचे आयोजित केले आहे.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.