मतदानाचे महत्व सांगण्यास प्रशासनाकडून स्वीप मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम

पंढरपूरात स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती

दर्शन रांगेतील भाविकांना गुलाब पुष्प व माहिती पत्रके देऊन मतदान करण्याचे केले आवाहन

स्वीप व भारत विकास परिषद स्वंयसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती

पंढरपूर दि.16: – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तसेच नागरिकांना मतदानाचे महत्व सांगण्यासाठी प्रशासनाकडून स्वीप मोहिमेंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत असून,चैत्री यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दर्शन रांगेत गुलाब पुष्प व मतदानाबाबत माहिती पत्रके देवून मतदार जागृती करण्यात आली.

स्वीप मोहिमेतर्गंत आज 42 सोलापूर लोकसभा मतदार संघातील 252 पंढरपूर विधानसभा मतदारसंघात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली व भारत विकास परिषद स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सारडा भवन येथील दर्शन रांगेत मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी समाधान नागणे, जगन्नाथ गारोळे,सहा.स्वीप नोडल अधिकारी अस्मिता निकम,भारत विकास परिषदेचे अध्यक्ष मंदार लोहोकरे,सचिव डॉ अनिल पवार,संस्थापक अध्यक्ष डॉ सुरेंद्र काणे,डॉ वर्षा काणे,निलीमा माळी,भाग्यश्री लिहणे, राजेंद्र केसकर,अजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.

चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूरात राज्यातील विविध जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दाखल झाले आहे.लोकसभा निवडणुकीत प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी मतदानाचे महत्व पटवून मतदान करण्याचे आवाहन केले.तसेच रेल्वे स्टेशन,बस स्थानक,आपत्ती व्यवस्थापन कक्ष,दर्शन रांग,पत्राशेड,65 एकर येथे मतदान जागृतीचे फलक लावण्यात आले आहेत.मतदान प्रकियेतील महिला तसेच नवमतदार असलेली युवापिढी यांचा सहभाग अधिक संख्येने वृध्दींगत करण्यासाठी स्वीप अंतर्गत विशेष भर देण्यात आला आहे. तालुक्यात बचत गट,अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या बीट विभागात सभा घेवून महिला व युवापिढी यांचे मतदान वाढविण्याबाबत जनजागृती केल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी समाधान नागणे यांनी सांगितले.


Discover more from Dnyan pravah news

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Reply

Back To Top

Discover more from Dnyan pravah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading