जनतेच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या,त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे जाऊ द्या अशी आई रुपाभवानी चरणी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केली प्रार्थना

खासदार प्रणितीताई शिंदे यांनी घेतले रुपाभवानी मातेचे दर्शन

सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सर्व माता भगिनी आणि सर्व समाज बांधवांच्या मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ दे, त्यांचे आयुष्य सुखासमृद्धीचे जाऊ दे अशी श्री रुपाभवानी देवी चरणी प्रार्थना . आई उदो उदो ,सदानंदीचा उदो उदो,भवानी माता की जय असा जयघोष करत श्री रूपाभवानी मंदिर येथे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी रूपाभवानी मातेचे दर्शन घेतले.

दर्शन घेतल्यानंतर खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या की, देवीच्या दर्शनाने एक वेगळी ऊर्जा मिळते.नवरात्रीत सर्वत्र देवीचा जागर असतो. पूजा-अर्चा करतात आणि देवीकडे प्रार्थना करतात. प्रत्येक महिलांमध्ये देवीचे रूप असते. आज आम्ही सगळे भाविक भक्त एकत्र येऊन श्री रुपाभवानी देवी चरणी माथा टेकत आहोत आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करत आहोत.आई रूपाभवानी तुझी कृपा सर्वांवर असू दे आणि माझ्या सर्व भावांना विनंती की जसे तुम्ही स्त्रीशक्तीचा जागर करता पूजाअर्चा करता पण हे विसरू नका प्रत्येकाच्या घरी एक देवीच्या स्वरुपात आई असते, एक मुलगी असते, एक बहीण असते, व पत्नी असते तिला पण तेवढाच मान सन्मान द्या हीच खरी देवी वरची श्रद्धा असेल असे मला वाटते.

माझ्या सगळ्या माता- भगिनींच्या,माझ्या सर्व समाज बांधवांचे सर्व सोलापूर शहर जिल्ह्यातील जनतेच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि त्यांचे आयुष्य सुख आणि समृद्धीचे जाऊ द्या अशी आई रुपाभवानी चरणी प्रार्थना केली आहे अशी भावना व्यक्त केली.

Leave a Reply

Back To Top