भाजपला तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही.सोलापूर च्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली- आमदार प्रणिती शिंदे
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२३/०४/२०२४- भाजपला तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही. सोलापूरच्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली. तुम्ही त्यांना खासदार केले. मात्र तुम्हाला त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यांनी तुमच्याकडून किमती मतदान घेतले. परंतु त्यांना आता तुमची आणि तुमच्या मतदानाची किंमत राहिलेली नाही, अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
लोकसभा निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढू लागला आहे. महविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या सध्या गावभेटी दौरे करत आहेत. मंगळवारी त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील निमगाव, बनजगोळ, भोसगा, तोरणी, संगोगी, हालहली, बिंजगेर गावभेट दौरा केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या फसव्या धोरणाविरोधात सडकून टीका केली.
कर्म बघून मतदान करा
यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या धर्म बघून मतदान करू नका, कर्म बघून मतदान करा. कारण कर्म महत्वाचे आहे, धर्म महत्त्वाचा आहे पण पूजा करताना, लग्न लावताना, असे प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीच्या वेळी काम महत्त्वाचे आहे.मी पंधरा वर्षांपासून आमदार असून जेव्हा जेव्हा सोलापूर अडचणीत आहे त्यावेळी मी विधानसभेत आवाज उठवला आहे,असे प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
यावेळी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे,माजी कृषी सभापती मल्लीकार्जुन पाटील,शरद पवार राष्ट्रवादी ता.प्रमुख बंदेनवाज कोरबु, काँग्रेस जि.कार्याध्यक्ष अश्फाकभाई बळोरगी,माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, निमगावचे माजी सरपंच महमंद पठाण, बसवराज नागणसुरे,हुसेनी शेख,अण्णाराव करविर, संजय व्हरकेरी,बाबासाहेब पाटील, माजी सरपंच विश्वनाथ इटेनवरू,प्रविण शटगार,अशोक ढंगापुरे,पिंटु पाटील,श्रीशैल रब्बा आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.
ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------