धक्कादायक: 3 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या

[ad_1]


Haryana News: नूहच्या पिंगवान पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी संध्याकाळी एका 30 वर्षीय व्यक्तीने तीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली.     

 

मिळालेल्या माहितीनुसार हत्या केल्यानंतरही नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. व चिमुरडीचा मृतदेह 50 फूट खाली खड्यात फेकून दिला. 

   

 

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 11 वाजता चिमुरडीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. चिमुरडी सापडत नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरु केली. रात्री 11 वाजता चिमुरडीचा मृतदेह आढळला. तसेच पोलिसांना तातडीने सूचना देण्यात आली व चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

Edited By- Dhanashri Naik 

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top