अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा केला सन्मान

अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा केला सन्मान

म्हसवड / ज्ञानप्रवाह न्यूज – विधानसेभेचे नवनिर्वाचित आमदार जयकुमार गोरे यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली त्यामुळे म्हसवड ता.माण येथे त्यांचा आभार दौरा आयोजित करण्यात आला होता.

त्यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी माजी नगराध्यक्ष तथा अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांची सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी अहिंसा पतसंस्था आणि स्टाफ, म्हसवड ग्रामस्थ,दोशी परिवाराच्या वतीने आमदार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांचे सौ राजश्री नितीन दोशी यांनी औक्षण करून सुजय नितीन दोशी,नितिन दोशी यांनी सत्कार केला.यावेळी श्रीमती इंदुमती दोशी, पतसंस्थेचे पदाधिकारी,अधिकारी,कर्मचारी बांधव उपस्थित होते.

ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना सांगितले की,नितीन भईंनी निवड झाल्या झाल्याच मंत्रीपदासाठी खात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या.आपल्या सर्वांनी विश्वासाने निवडून दिले त्या विश्वासाला पात्र ठरत विकासकामांना प्राधान्य देणार आहे.

Leave a Reply

Back To Top