पंढरपूर उजनी वसाहतीतील शासकीय निवासस्थानांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जलसंपदा विभागाची कडक कारवाई :

पंढरपूर उजनी वसाहतीतील शासकीय निवासस्थानांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी जलसंपदा विभागाची कडक कारवाई : ४० घरे करण्यात आली रिक्त

Pandhapur ujani news : पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज – उजनी वसाहत पंढरपूर येथील शासकीय निवासस्थानांवरील अतिक्रमणाबाबत जलसंपदा विभागाने अखेर ठोस पावले उचलली आहेत. वारंवार नोटिसा देऊनही संबंधितांनी अतिक्रमण हटवले नाही.त्यामुळे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली.

जलसंपदा विभागाचे मंत्री डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निर्देशानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.या कारवाईत सोलापूर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक तथा अधीक्षक अभियंता एस.एस.खांडेकर, कार्यकारी अभियंता गणेश कथले तसेच भिमा पाटबंधारे विभाग, पंढरपूर येथील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.

उपविभागीय अधिकारी आकाश जाधव यांच्यासह विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष कारवाई केली.या मोहिमे दरम्यान एकूण ४० शासकीय निवासस्थाने रिक्त करण्यात आली असून उर्वरित निवासस्थानांवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई अद्याप सुरू आहे.

शासकीय मालमत्तेवरील बेकायदेशीर अतिक्रमण सहन केले जाणार नाही,असा स्पष्ट इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.पुढील काळातही अशा प्रकारच्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Back To Top