पंढरपूरच्या उपनगरातील नगरपालिकेच्या खुल्या जागांवर कचराकुंड , अतिक्रमण व अनैतिक धंदे – यशवंत डोंबाळी

पंढरपूरच्या उपनगरातील नगरपालिकेच्या खुल्या जागांवर कचराकुंड , अतिक्रमण आणि अनैतिक धंदे – यशवंत जगन्नाथ डोंबाळी सामाजिक कार्यकर्ता

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरच्या उपनगरातील नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर अतिक्रमणे वाढलेली आहेत व कचरा टाकण्यासाठीही वापर होतोय , त्यामुळे खुल्या जागा अक्षरशः कचराकुंड झाल्या आहेत. त्यामुळे डास आणि डुकरांचा सुळसुळाट झाला असून नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होऊन साथींच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे .

तसेच नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वृक्षतोड होत आहे.नगरपालिका व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खुल्या जागा या सायंकाळनंतर अनैतिक कृत्यांच्या अड्डा बनत चालल्या आहेत.सर्वसामान्य नागरिकांना मान खाली घालून वावरावे लागते आहे . नगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागांवर लोकांनी अतिक्रमणे केलेली आहेत.पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने उपनगरातील त्यांच्या मालकीच्या खुल्या जागांना त्वरीत कुंपण घालत बंदिस्त करून सुशोभित कराव्यात अथवा विकसित करण्यासाठी सामाजिक संस्थांना द्याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top