खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधी तून ११ गरजू रुग्णांना अर्थसहाय्य मंजूर

खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ११ गरजू रुग्णांना उपचारासाठी एकूण २१,००,०००/- (एकवीस लाख) रुपये अर्थसहाय्य मंजूर

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०१/२०२५ : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या रुग्णांना, गंभीर आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना, दुर्धर आणि महागड्या आजाराच्या रुग्णांना उपचाराकरीता हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात येतेे.त्यांना औषधोपचारा करीता लाखो रुपये खर्च येत असल्यामुळे त्यांना उपचारा करीता अनेक अडचणी निर्माण होत असतात.सदर रुग्णांच्या नातेवाईकांनी खासदार प्रणितीताई शिंदे यांना भेटून निवेदन दिले होते.

पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून औषधोपचाराकरीता आर्थिक मदत मिळण्याकरीता खासदार प्रणितीताई शिंदे यांनी सतत पाठपूरावा करून ११ रुग्णांना एकूण २१,००,०००/- (एकवीस लाख) रुपये अर्थसहाय्य मिळवून दिली.

पंतप्रधान सहायत्ता निधीतून
१) अरुण रामचंद्र इंगोले ३,००,०००/-
२) व्रितीका विशाल कंदले ३,००,०००/-
३) वैभव जितेंद्र लेंडवे ३,००,०००/-
४) बसू रवी कांबळे ३,००,०००/-

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून
५) फराज अरफात शेख ५०,०००/-
६) राम बाबू चव्हाण १,००,०००/-
७) सुमय्या अखिल पठाण १,००,०००/-
८) किरण फडतरे १,००,०००/-
यांच्यासहित इतर तीन रुग्णांना ५,५०,०००/- रुपये

पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी,मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ११ रुग्णांना उपचारा साठी एकूण २१,००,०००/- (वीस लाख) रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले.

महागड्या आजारांवरील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळाल्याने या कुटुंबांना मोठा आधार मिळाला आहे.त्याबद्दल रुग्णांच्या नातेवाइकांनी खासदार प्रणिती ताई शिंदे यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Back To Top