इंधन बचत व प्रदूषण मुक्ती करिता घेण्यात येणारी पंढरी सायल्कोथाॅन २०२५ उत्साहात संपन्न
आम्ही पंढरपूरकर फाॅऊंडेशन व जिल्हा सायकलींग असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येते पंढरी सायक्लोथॉन २०२५

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- इंधन बचत व प्रदूषण मुक्तीचा प्रयत्न याकरिता आम्ही पंढरपूरकर फाॅऊंडेशन व जिल्हा सायकलींग असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्यावतीने दरवर्षी घेण्यात येणारी पंढरी सायक्लोथॉन २०२५ रविवार दि.१६ फेब्रुवारी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू आली.

सदर पंढरी सायक्लोथॉन मध्ये अंदाजे ३७०० सायकल प्रेमींनी नाव नोंदणी करून सुद्धा ५००० च्यावर सायकलस्वार यावेळी हजर होते.शालेय जिवनात मुलांमध्ये सायकली विषयी प्रेम वाढावे व सायकल आरोग्यसाठी किती उपयुक्त आहे तसेच इंधन बचत व प्रदूषण मुक्ती करिता घेण्यात येणारी सायकल मॅरेथॉन गेली पाच वर्षापासून आम्ही पंढरपूर फाउंडेशन व जिल्हा सायकलींग असोसिएशन ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त आयोजन करीत असल्याचे आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम यांनी माहिती दिली.

सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला टी-शर्ट, खाऊ तसेच प्रशस्ती पत्रिकाचे वाटप करण्यात आले.पंढरी सायक्लोथॉनची सुरवात माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील, चंद्रकांत बागल यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनची सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ.मनोज भायगुडे,राधेश बादले-पाटील महाराज, कुमार वाघमोडे, डॉ.स्वप्नील शेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणून डीव्हीपी उद्योग समूह,कुमार प्रॉपर्टीज,चंदूकाका सराफ,डॉ.भायगुडे,सुहासिनी उद्योग समूह, दीप सायकल,ट्युलिप हॉस्पिटल,डॉ. बोरावके हॉस्पिटल,जे. एम.ग्रुप,डॉ.जाधव हॉस्पिटल,एस.के.मेनकुदळे,ताटे अगरबत्ती, ताटे देशमुख कन्स्ट्रक्शन आदींनी या पंढरी सायक्लोथॉनसाठी मोलाचे सहकार्य केले.
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन आम्ही पंढरपूरकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर कदम,मनजित कदम,नवनाथ बाबर, राजाभाऊ गोसावी,रौफ बागवान, मुकेश निर्मळे,शेखर भोसले, विठ्ठल भूमकर,प्रकाश कदम,सतीश माने,गणेश थिटे,नाना शिंदे आदींनी प्रयत्न केले.