परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांची जुगारींवर धाडसी कारवाई

परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा प्रभारी अधिकारी पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे  शुभम कुमार यांची जुगारींवर धाडसी कारवाई

मोहोळ /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.२२/०५/२०२४- आज रोजी परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार स्वतः सोबत पो.हे.कॉ.सुनिल किसनराव मोरे, पो.हे. कॉ.उबाळे,पो.हे.कॉ.नलवडे सर्व नेमणूक पंढरपूर तालूका पोलीस ठाणे, पो.कॉ.येवले, चा.पो.कों.डी५१ चाटे दोघे नेमणूक पोलीस मुख्यालय,सोलापूर ग्रामीण असे मौजे. अनगर, ता.मोहोळ येथील अनगर ते माढा जाणार्या रोडवरील अनगर पासून साधारण अर्धा किमी अंतरावर असणार्या एचपी पेट्रोल पंपाशेजारी असणार्या दोन मजली लोकनेते पॅलेस येथील बंद खोल्यांमध्ये मिळालेल्या माहितीनुसार जावून पाहणी केली .

यावेळी सदर पॅलेसच्या खालील मजल्यावर व वरील बाजूच्या मजल्यावर काही लोक गोलाकार बसल्याचे दिसून आले. त्यांचा जुगार गुन्ह्याचे कामी संशय आल्याने त्यांना गराडा घालून सुमारे २०:४५ वा.जागीच पकडले. लागलीच रस्त्याने येणार्या जाणार्या दोन इसमांना पंच म्हणून बोलावून घेवून त्यांचेसमक्ष खालील बाजूचे मजल्यावरील लोकांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी आपले नावे १) रियाज बासू मुजावर, वय ३८ वर्षे, रा.दत्तनगर मोहोळ,२) विनायक निलकंठ ताकभाते, वय ४३ वर्षे, रा. आवंतीनगर, जुना सोलापूर नाका, सोलापूर, ३) फारुख शेख याकुब, वय ३८ वर्षे, रा. ओमनगर, सुरत, राज्य गुजराथ, ४) नितीन सारंग गुंड, वय – ३७ वर्षे, रा. अनगर, ता. मोहोळ, ५) ओंकार विजय चव्हाण, वय २७ वर्षे, रा. चिंचनाका, चिपळून, जि. रत्नागिरी, ६) राजू लक्ष्मण भांगे, वय २८ वर्षे, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर, ७) महादेव बंडोबा पवार, वय ३५ वर्षे, रा. १४७, दक्षिण कसबा, सोलापूर. ८) मनोज नेताजी सलगर, वय – ४२ वर्षे, रा. नवीपेठ, सोलापूर. ९) स्वप्निल प्रविण कोठा, वय ३५ वर्षे, रा.राजीव नगर, सोलापूर. १०) रोनक नवनीत मर्दा, वय २८ वर्षे, रा.मर्दा मंगल कार्यालय, सोलापूर. ११) हर्षल राजेंद्र सारडा, वय ३५ वर्षे, रा. वर्धमान नगर, सोलापूर.१२) कृष्णा अर्जुन काळे, वय ४७ वर्षे, रा.संजय गांधी नगर,विजापूर नाका, सोलापूर. १३) अनिल किसन चव्हाण, वय ५२ वर्षे, रा. अलराईन नगर, सांगोला. १४) धानप्पा प्रकाश भदरे, वय ४६ वर्षे, रा. नवी पेठ, सोलापूर. १५) अबरार करीम फकीर, वय ५६ वर्षे, रा. उकताड गणेश मंदीर, चिपळून, जि. रत्नागिरी, १६) लखन जगदीश कोळी, वय ३३ वर्षे, रा. समर्थ नगर, मोहोळ, १७) सोमनाथ दादासाहेब मोरे, वय २९ वर्षे, रा. दत्त नगर, मोहोळ, १८) महादेव मुरलीधर दगडे, वय ३९ वर्षे, रा. करोळे, ता.पंढरपूर. १९) राम बलभिम कदम, वय ५४ वर्षे, रा. अनगर, ता. मोहोळ, २०) कृष्णा कल्याण राऊत,वय ३७ वर्षे,रा.बागेचीवाडी,अकलूज, ता. माळशिरस, २१) विलास धर्मराज कडेकर,वय – ४० वर्षे, रा.कुप्पा,ता.वडवणी, जि.बीड, २२) सुशिल कैलास लंगोटे, वय ४४ वर्षे, रा. श्रीराम नगर, माढा अशी असल्याची तसेच दुसऱ्या मजल्यावर मिळून आले इसमांकडे त्यांचे नाव पत्ता बाबत विचारणा करता त्यांनी आपली नावे २३) दिपक चंद्रकांत गायकवाड, वय ४२ वर्षे, रा.अनगर, ता. मोहोळ, २४) राजू हसन शेख, वय ४६ वर्षे, रा.पोखरापूर, ता.मोहोळ, २५) आयाज इब्राहिम सय्यद, वय ३५ वर्षे,रा.आण्णाभाऊ साठे नगर,मोहोळ,२६) दिनेश सुखदेव चवरे, वय ५२ वर्षे,रा.पेनूर,ता.मोहोळ,२७) बालाजी केरबा भोसले,वय ५४ वर्षे, रा.कोंडी,ता.उत्तर सोलापूर. २८) ऑकार नेहरु बरे, वय ३० वर्षे, रा. बुधवार पेठ, मोहोळ, २९) आप्पा सिद्राम पाटील, वय ४७ वर्षे, रा.घोडेश्वर, ता.मोहोळ, ३०) एकनाथ भगवान चांगीरे, वय ५१ वर्षे, रा. परळी, जि. बीड, ३१) विशाल रघुनाथ क्षीरसागर, वय २९ वर्षे, रा. सिध्दार्थ नगर, मोहोळ, ३२) संभाजी सोपान कवितकर, वय ७७ वर्षे, रा.अनगर, ता. मोहोळ, ३३) फिरोज बाबू शेख, वय ४५ वर्षे, रा. गुलशाननगर मोहोळ. ३४) सिताराम रामचंद्र कुंभार, वय २४ वर्षे, रा.समर्थ नगर, मोहोळ. ३५) सज्जन लक्ष्मण शेळके, वय ३७ वर्षे, रा. कोन्हेरी, ता. मोहोळ, ३६) गोविंद महादेव पाटील, वय ४० वर्षे, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर, ३७) प्रशांत प्रकाश पाटील, वय ४५ वर्षे, रा.वैराग, ता.बार्शी, ३८) सोमनाथ भिमराव जोकारे, वय ५४ वर्षे, रा. कांदलगाव, ता. दक्षिण सोलापूर अशी असल्याचे सांगितले.

वरील सर्व इसम हे ५२ पानाचे पत्यांवर तिरट नावाचा जुगार खेळत असताना मिळून आल्याने पंचासमक्ष त्यांची अंगझडती व दोन्ही मजल्यांवरील खोल्यांची झडती घेतली असता एकूण 10036900 असा मुद्देमाल मिळून आल्याने तो गुन्ह्याचे तपासकामी पो.हे.कॉ.उबाळे यांनी पंचासमक्ष जप्त करुन त्यास पंचाचे व पोलीसांचे सह्यांचे कागदी लेबल लावले असून रोख रक्कम,वाहनं, मोबाईल आदी वस्तु ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

या मोठ्या धाडसाने केलेल्या कारवाईमुळे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत असून या पुढेही अशाच प्रकारे कारवाई अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.कोणत्याही दबावाखाली न येता कारवाई करण्यात आली असल्याने परि.सहा.पोलीस अधीक्षक तथा पंढरपूर तालूका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी शुभम कुमार यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Back To Top