टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी आतापासूनच तयारीला लागा-आ.समाधान आवताडे

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याची कमतरता जाणवू नये यासाठी अधिकाऱ्यांनी आतापासूनच तयारीला लागा- आ.समाधान आवताडे यांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा तालुक्यामध्ये सुरू असलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालवून येऊ घातलेल्या दुष्काळी परिस्थितीमध्ये लोकांचे व जनावराचे पाण्यावाचून हाल होता कामा नये याची जबाबदारी अधिकारीवर्गाची असून प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे करावे. ज्या ठिकाणी अडचण येत असेल त्या ठिकाणी थेट माझ्याशी संपर्क साधून मार्ग काढावा, जनतेस वेठीस धरून टंचाई काळात कोणी काम केले तर मी ते खपवून घेणार नाही असा इशारा आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिला ते मंगळवेढा तालुक्यातील जलजीवन मिशन योजना, भोसे प्रादेशिक योजना, आंधळगाव प्रादेशिक योजना आणि घरकुल आणि विहीर योजनांचे लाभार्थी या विषयांच्या आढावा बैठकीत बोलत होते. मंगळवेढा पंचायत समितीच्या सभागृहामध्ये ही आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी व्यासपीठावर प्रांताधिकारी बी.आर.माळी,तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी योगेश कदम, ग्रामीण पाणीपुरवठा चे संजय धनशेट्टी,प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे सुनील देशपांडे, भोसे प्रादेशिक चे काटकर, महावितरण, बांधकाम ,कृषी या सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेताना पाणीपुरवठा अधिकारी काटकर यांनी सांगितले की भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये चाळीस गावे असून त्यातील 20 गावांना सध्या पाणीपुरवठा सुरू आहे सात गावांनी मागणी केली असून इतर गावांनी पाण्याची मागणी केली नसल्यामुळे त्या गावांना अद्याप पाणी सुरू नाही यावेळी टंचाई काळात दुरुस्तीसाठी एक कोटीचे अंदाजपत्रक तयार केले असून मंजुरीसाठी पाठवले आहे सौरऊर्जेवरती ही योजना सुरू करण्यासाठी सोलरचेही काम सुरू असून जुनोनी येथील काम पूर्ण झाले आहे तर उजेठाण येथील काम अद्याप सुरू झालेले नाही असा भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा आढावा देण्यात आला यावेळी अनेक गावांना उच्च दाबाने पाणी मिळत नसल्याची तक्रार केल्यानंतर आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले की ही भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन 7 वर्ष झाले तरीही लेंडवेचिंचाळे सारख्या गावांना अद्याप टाकीत पाणी मिळाले नाही त्यामुळे चुकीचे डिझाइन करून काम केलेल्या त्या ठेकेदाराकडून रक्कम वसूल करण्याचा प्रस्ताव तयार करून पाठवा.त्याचे जिथे कुठे काम सुरू असेल तिथून ती रक्कम वसूल करण्याचे संबंधित खात्याला पत्र द्या अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.यावेळी भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना शिखर समिती चालवत असून शिखर समिती कडून पुन्हा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेकडे ही योजना वर्ग करण्याचा ठराव करण्यात आला.
 
जलजीवन योजनेतून हर घर जलसे नल अंतर्गत 77 कामे सुरू असून 80 कोटी रुपये शासन मंगळवेढा तालुक्यासाठी खर्च करत आहे मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी जलजीवनच्या ठेकेदारांनी पीडब्ल्यूडी असो किंवा जिल्हा परिषदचे रस्ते असो त्या रस्त्याच्या साईड पट्टीवरून पाईपलाईन केली असल्याच्या तक्रारी लोकांनी निदर्शनास आणून दिल्या.काही ठिकाणी कामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी असून आमदार समाधान आवताडे यांनी या कामावर नाराजी व्यक्त केली.ज्यांनी ही कामे सुरू केली नाहीत अथवा ज्या कामावर तक्रारी आहेत अशा ठेकेदारांना नोटीसा काढा व त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून दुसऱ्या ठेकेदाराकडून कामे करून घ्या अशा सूचनाही देण्यात आल्या.त्याचबरोबर जलजीवन योजनेमध्ये अनेक वाड्यावस्त्या वगळल्या असून त्या वस्त्यांचाही या योजनेमध्ये समावेश करण्यासाठी फेर अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी पंचायत समिती अंतर्गत सुरू असलेल्या रोजगार हमी विहिरी घरकुल या योजनांचाही आढावा घेत गोरगरीब जनतेला कोणत्याही प्रकारचा अडथळा अधिकाऱ्यांनी करू नये अशा सूचना देत आढावा बैठकीची सांगता केली.

त्या बैठकीला संबंधित खात्याचे अधिकारी, पदाधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top