आता लवकरच ओढ्याच्या पुलाची उंची वाढून नागरिकांना त्याचा फायदा होणार – आमदार अभिजीत पाटील

करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्याच्या पुलाचे आ. अभिजीत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील धाकटी वेस बंधाऱ्यावरील पुलाचे अनेक वर्षांपासून प्रलंबित कामाचा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी मार्गी लावत कामाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

मागील अनेक वर्षांपासून करकंब येथील धाकटी वेस येथील ओढ्याच्या बंधाऱ्यावरून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते त्यामुळे गावातील शेतकरी, विद्यार्थी व वयोवृद्ध नागरिकांचे हाल होत होते.आता लवकरच ओढ्याच्या पुलावरील उंची वाढून नागरिकांना त्याचा फायदा होणार असल्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी सांगितले.

आमदार अभिजित पाटील यांच्या हस्ते नवीन पुलाचे उदघाटन करण्यात आले त्यावेळी उद्योजक अमोल शेळके,पै.सुभाष गुळमे, बापू रेडे,अजित देशमुख,अशोक देशमुख, काका देशमुख, बाजीराव वंजारी, शंकर राऊत, राजू शेटे, संतोष शिंदे,राजाभाऊ खारे, शिवाजी सलगर, सचिन दुधाळ, पांडुरंग शेटे,उमेश पांढरे, संतोष घाडगे, उस्मान मणेरी, विलास घाटूळे, गणेश शिंदे, अशोक नाईकनवरे,भिमराव मदने आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top