जनतेचे आभार मानण्यासाठी नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यांवर
गावभेट दौऱ्यातून मोहोळ तालुक्यातील शेटफळ, वाफळे, देवडी, तेलंगवाडी, हिवरे या गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या सूचना

मोहोळ / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.17 जून 2024 – खासदार प्रणिती शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंर मोहोळ तालुक्यातील जनतेचे कृतज्ञता आणि आभार मानण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी गावभेट दौरा आयोजित केला होता.

यावेळी शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मोहोळ तालुक्यातील शेटफळ, वाफळे, देवडी, तेलंगवाडी, हिवरे या गावांना भेट देऊन जनतेचे आभार मानले.

शेटफळ, वाफळे, देवडी, तेलंगवाडी, हिवरे गावातील नागरिकांच्या समस्या खासदार प्रणिती शिंदे यांनी जाणून घेतल्या आणि ताबडतोब नागरिकांच्या समस्यांसंदर्भात अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन तात्काळ निवारण करण्याच्या सूचना केल्या.

नागरीकांच्या समस्या त्यांच्याच गावात अधिकाऱ्यांच्या समक्ष ऐकून त्या तात्काळ सोडवल्याने लोकांना होणारा त्रास काही प्रमाणात कमी होणार आहे व त्यांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे.

या गावभेट दौऱ्यात सुलेमान तांबोळी,राजेश पवार, मनोज यलगुलवार, महादेव जवंजाळ, दिलीप वागज,संतोष पाटील, अनिल चव्हाण, राजेंद्र सर्जे, अतुल.मोरे,आकाश कानगुडे, उमेश मोरे यांच्यासह विस्तार अधिकारी देशमुख, वाघमारे, PSI प्रशांत भागवत, कृषी सहायक वाघमोडे, सहायक अभियंता सागर शेळके, ग्रामसेवक भोसले, तलाठी पाटोळे, यांच्यासह इतर अधिकारी वर्ग,गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.