स्वेरीमध्ये ‘जागतिक सर्जनशीलता आणि नवोपक्रम दिन’ उत्साहात साजरा
वेस्ट टू प्रोटोटाईप व टेक्निकल आयडीया फॉर क्रिएटिव्ह ट्रीज यावर स्पर्धा संपन्न
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०५/२०२५ –स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध संशोधन प्रकल्प निर्माण केले आहेत. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ प्रकल्पांची निर्मिती केल्याचे दिसून आले. एकूणच विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी अशा स्पर्धात्मक व्यासपीठाची निर्मिती केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यवसाय निर्मिती व जागतिक बाजारपेठेचा दर्जा पाहून आपल्या प्रकल्पांवर अधिक लक्ष द्यावे ,असे प्रतिपादन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डॉ.आरती करांडे यांनी केले.

गोपाळपूर ता.पंढरपूर येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर (ऑटोनॉमस) मध्ये वर्ल्ड क्रिएटीव्हीटी अँड इनोव्हेशन डे २०२५ हा उपक्रम इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) अंतर्गत उत्साह साजरा करण्यात आला.या निमित्ताने वेस्ट टू प्रोटोटाईप व टेक्निकल आयडीयाज् फॉर क्रिएटिव्ह ट्रीज या दोन वेगवेगळ्या स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या.याप्रसंगी डॉ. आरती करांडे ह्या मार्गदर्शन करत होत्या.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार,आय.आय सी.प्रेसिडेंट डॉ.दिग्विजय रोंगे व विभागप्रमुख डॉ.सुमंत आनंद यांच्या नेतृत्वाखाली इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) आणि इन्स्टिट्यूशन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल (आयईईई) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डॉ.आरती करांडे या उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर डॉ.करांडे यांचा शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.या वर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना ही वेस्ट टू प्रोटोटाईप आणि टेक्निकल आयडीया फॉर क्रिएटिव्ह ट्रीज या बाबींवर आधारित होती.या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी पुनर्वापर, पुनरुत्पादन व पुनर्निर्मित साहित्यांचा वापर करून नावीन्यपूर्ण नमुने (मॉडेल्स) सादर केले. या संकल्पनांद्वारे विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाची दिशा मिळाली.
प्रस्तावना व परीक्षण यानंतर प्रदर्शनाला सुरुवात झाली.विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांतून वेगवेगळ्या कल्पना सादर केल्या.परीक्षकांनी नाविन्यता, तांत्रिक बाजू व शाश्वततेच्या आधारे या प्रकल्पांचे परीक्षण केले. त्यांनतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
भयामध्ये प्रथम क्रमांक: श्रीराम कृष्णनाथ पतंगे,नेहा उद्धव सोमवंशी व सरस्वती शिंदे तर द्वितीय क्रमांक- वैकुंठी शिवराज जाधव, सुहानी संजय शिंदे, मयुरी रविंद्र माने व अमृता शरद गायकवाड यांनी मिळविला.या कार्यक्रमाचे समन्वक म्हणून प्रा.स्मिता गावडे यांनी काम पाहिले.यावेळी विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती, प्रा. प्राजक्ता तुपारे यांच्यासह इतर प्राध्यापक उपस्थित होते.सूत्रसंचालन जय गाडेकर यांनी केले. आभार डॉ.यशपाल खेडकर यांनी मानले.