पौडमधील मंदिरातील विटंबना कृत्य हे समाजविघातक, अशा नराधमांवर कठोर कारवाई होणार- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचा इशारा


छत्रपती शिवाजीनगर शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे उद्घाटन; महिलांच्या आरोग्यासाठी विशेष शिबिरांची घोषणा

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.४ मे २०२५ :मुळशी तालुक्यातील पौड येथील नागेश्वर मंदिरात अन्नपूर्णा देवीसमोर घडलेली विटंबनेची घटना अत्यंत घृणास्पद आणि समाजविघातक आहे. हे कृत्य करणारा व्यक्ती माणूस नसून हैवान आहे. त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि होणारच,असा ठाम इशारा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिला.


गोखलेनगर येथे पार पडलेल्या शिवसेना छत्रपती शिवाजीनगर विधानसभा सदस्य नोंदणी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाचे संयोजन पुणे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, सहसंपर्कप्रमुख अजय भोसले यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.
युवासेना सचिव किरण साळी,उपशहर प्रमुख संजय डोंगरे, विधानसभा प्रमुख युवराज शिंगाडे, विभाग प्रमुख संजय तुरेकर, अक्षदा धुमाळ, राजू विटकर, बाळासाहेब मालुसरे, रोहित वेणूसे यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
डॉ.नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या,वानरही रामकथेचा आदर करतात आणि गुरुदत्तांच्या मागे लहान प्राणीही असतात.अशा पवित्र ठिकाणी हे घडणे दुर्दैवी आहे.अफवा पसरवायच्या नाहीत, पण वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. पोलिस अधिक्षकांना बोलावले असून, मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या प्रकाराविरोधात कडक कारवाईसाठी निवेदन देणार आहे.
त्याचबरोबर समाजात काही बाहेरून आलेले लोक बेकायदेशीर व्यवसायाच्या माध्यमातून सामाजिक शांततेला बाधा पोचवत आहेत. त्यामुळे एक है तो सेफ हा नारा विसरता कामा नये. अशा घटकांविरोधात जनतेने सजग राहिले पाहिजे,असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांच्या आरोग्यासाठी विशेष अभियानाची घोषणा करत १५ ऑगस्टपर्यंत २००-३०० महिला व मुलींचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जातील. त्याचबरोबर मुलींना (१२ ते १८ वर्ष वयोगटातील) या शिबिरात कॅन्सर पासून संरक्षण देणारे मोफत लसीकरणही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.रक्त आणि कॅल्शियम कमी असले तरी महिलांचा आवाज खणखणीत असतो, पण संघटना मजबूत हवी असेल तर तब्येतही मजबूत हवी असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमात छत्रपती शिवाजीनगर नावाची अधिकृत मागणी,शिवसेनेच्या आगामी नगरसेवक निवडीची दिशा आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा कार्यक्रम यशस्वी ठरला.

