अमोल शेळके यांची महसूल सहाय्यक पदी निवड
पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील चिलाईवाडी येथील अमोल पितांबर शेळके हे एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने त्यांची महसूल सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली आहे.
अमोल शेळके यांची आई घरकाम करते तर वडील कंपनीत ड्रायव्हर म्हणून नोकरीस आहेत.आपल्या मुलाला उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे या जिद्दीने त्यांनी आपल्या मुलांना शिकवण्याची ध्येय उराशी बाळगले व त्यांनी अमोल यास ज्ञानसंपदा हायस्कूल मुंबई येथे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठविले. त्यानंतर अमोल शेळके यांनी आई – वडील यांच्या प्रयत्नांना साथ देत कोणत्याही परिस्थितीत आपण उच्च शिक्षित व्हायचं ही खुणगाठ मनात बांधली .अमोल यांस त्यांचे बंधू पीएसआय स्वप्निल शेळके यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

पुढे अमोल शेळके यांनी ठाणे येथील ठाणे वाला कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण केले व एमपीएससी परीक्षेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी नवी मुंबई येथे अभ्यासाचा अहोरात्र सराव केला. अमोल शेळके 2025 च्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे.
अमोल शेळके यास आई पद्मिनी शेळके, वडील पितांबर शेळके, मामा कै.राजेंद्र गुंड, मोठा भाऊ पीएसआय स्वप्निल शेळके,मामा तानाजी गुंड,मामा विठ्ठल गुंड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. अमोल पितांबर शेळके यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.