एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100%

एमआयटी कॉलेज वाखरी पंढरपूरचा बारावीचा निकाल 100%

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील एमआयटी कॉलेज, वाखरीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले असून संस्थेचा निकाल 100% लागला आहे.

या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या परीक्षेत पंडिलवार रिशीत संदीप( 92.83) याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर देशमुख प्रतीक्षा तुकाराम ( 87.67) हिने द्वितीय आणि कोठारी पार्थ कल्पक( 84.67) याने तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांचे हेड मिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी आणि प्राचार्य डॉ.स्वप्नील शेठ यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Back To Top