आवताडे शुगरच्या बगॅसला आग,२ कोटींचे नुकसान

आवताडे शुगरच्या बगॅसला आग; २ कोटींचे नुकसान

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – मंगळवेढा तालुक्यातील नंदूर येथील आवताडे शुगरच्या बगॅसला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून अंदाजे ५००० मे.टन लुज बगॅस जळाला असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे. या आगीमध्ये सुमारे २ कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे समजत आहे.

दि.०९ मे २०२५ रोजी दुपारी ३:३० च्या दरम्यान कारखान्याच्या लुज बगॅसला अचानक भीषण आग लागली. त्यामध्ये अंदाजे ५००० मे.टन लुज बगॅस जळाला आहे. आग लागल्याची माहिती कारखाना कर्मचार्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाच्या मंगळवेढा,पंढरपूर, सांगोला व लोकमंगल शुगर,भंडारकवठे येथील अधिकाऱ्यांना संपर्क साधून अग्निशामक यंत्रणा बोलवून घेतली व लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.आवताडे शुगरचा तिसरा गाळप हंगाम संपला असून अचानक लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती कार्यकारी संचालक मोहन पिसे यांनी दिली.

Leave a Reply

Back To Top