कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

कासेगांव/ज्ञानप्रवाह न्यूज/शुभम लिगाडे,दि.15 मे- पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये सुमारे 52 रक्तदात्यांनी रक्तदान केले.छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन सरपंच शिवाजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घटनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमासाठी भास्कर घायाळ,प्रमोद देशमुख सर,गणपत भोसले, शंभूराजे प्रतिष्ठान बेंदवस्ती चे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top