नवी मुंबईतील युवक शिवसेनेच्या विचाराशी एकनिष्ठ आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यास सक्षम – शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे

वाशी येथे झालेल्या शिवसेना युवासेनेच्या विजय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबईतील युवक शिवसेनेच्या विचाराशी एकनिष्ठ आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्षम – शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे

नवी मुंबई ,दि.१६/०५/२०२५-आज नवी मुंबईच्या वाशी येथे पार पडलेल्या शिवसेना युवासेनेच्या विजय संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. युवा सैनिकांनी दाखवलेला जोश, आत्मविश्वास आणि निष्ठा पाहून हे स्पष्ट झालं की,नवी मुंबईतील युवक शिवसेनेच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत आणि पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी सक्षम आहेत असे शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

या मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी खालील मुद्द्यांवर ठामपणे भर दिला त्या म्हणजे-
युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना अधिक बळकट केली पाहिजे. फक्त घोषणांवर नव्हे, तर कामावर विश्वास ठेवणाऱ्या नव्या पिढीने आता मैदानात उतरून सक्रिय योगदान द्यायला हवं. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना अधिक जोमाने काम करत असून अनेक जनकल्याणाचे निर्णय घेत आहे.हे निर्णय याची माहिती लोकांपर्यंत पोहचवावी.

युवासेनेचं रूप आता बदलत आहे. ती केवळ सभा-मेळावे, बाईक रॅली काढणारी संघटना न राहता समाजात बदल घडवणारी, लोकांच्या समस्या ऐकणारी आणि त्यासाठी लढणारी चळवळ बनत आहे.राजकारण म्हणजे केवळ सत्तेची चढाओढ नाही तर लोकसेवेची संधी आहे.ही संधी युवकांनी ओळखून समाजा साठी आणि पक्षासाठी काम करणे गरजेचे आहे.

घराघरात जाऊन शिवसेनेचा विचार पोहोचवावा.सोशल मीडियासोबतच थेट जनतेशी संवाद साधून त्यांचा विश्वास जिंकणं गरजेचं आहे.त्यांच्या समस्या जाणून घेणे तितकेच महत्वाचे असून त्या सोडविण्या साठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.आता महापालिका निवडणुका जवळ येत आहेत.घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधणे, प्रभागातील युवक-युवतींना सोबत घेत शिवसेनेची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात वाढवावी.

पक्षात काम करताना मेहनतीला पर्याय नाही. ज्या तरुणांनी पक्षासाठी रात्रंदिवस एक केली त्यांना पक्षानेही मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत. तुम्हीही जर प्रामाणिकपणे,निष्ठेने, आणि सातत्याने आता करता आहात अशी मेहनत केलीत तर निश्चितच पक्षात वरच्या पातळीपर्यंत पोहोचण्याची संधी तुम्हालाही मिळणार आहे.

युवाशक्तीच्या माध्यमातून नव्या राजकारणाचा आरंभ करत शिवसेना मजबूत बनवत महाराष्ट्र घडवूया असे आवाहन शिवसेना नेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले.

यावेळी नवी मुंबई युवासेना जिल्हाप्रमुखपदी अनिकेत म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी शिवसेना खासदार नरेश म्हस्के,आमदार विजय शिवतारे, युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, उपनेते विजय नाहटा,उपनेते विजय चौघुले, प्रवक्ते राहुल लोंढे, जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, किशोर पाटकर,किरण साळी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी,युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top