श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०५/२०२५: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस ५.२५ लाख किंमतीचा व ६१.४८ ग्रॅम वजनाचा सोने पदकासह तुळशी हार नागपूर येथील भाविक आशा नवघरे यांनी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान केला.यावेळी देणगीदार यांचे कुटुंब व मंदिर समितीचे देणगी विभाग प्रमुख राजेंद्र सुभेदार उपस्थित होते.

