सहकार शिरोमणीची फसवणूक केल्याप्रकरणी वाहन मालकास अटक

सहकार शिरोमणीची फसवणूक केल्याप्रकरणी वाहन मालकास अटक

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज : ऊस तोडणी करुन वाहनांद्वारे ऊस पुरवठा करण्याचे करार करून प्रत्येकी ५ लाख प्रमाणे एकूण १५ लाख रूपये उचल घेऊनही संबंधित यंत्रणा न पुरविता चंद्गभागानगर भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे नुकसान व फसवणूक केल्याप्रकरणी ३ जणांविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील दुसरा आरोपी याला पोलिसांनी मेडद ता.माळशिरस येथून अटक करण्यात आली होती सदर आरोपीस दि.21/05/2025 ते दि.22/05/ 2025 पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आलेली होती. दि.22/05/2025 न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

देविदास विठ्ठल तरडे,राणी देविदास तरडे रा.बज़रंग वस्ती, कचरेवाडी,ता.माळशिरस व यशवंत बाळासाहेब लवटे रा. मेडद,ता. माळशिरस अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.सन २०२४-२५ या ऊस गळीत हंगामात सहकार शिरोमणी साखर कारखान्यासाठी मज़ुरांमार्फत ऊस तोडणी करून वाहनांद्वारे पुरवठा करण्याबाबतचे करार यातील तिघांनी केलेले होते. त्यापोटी कारखान्याने त्यांना प्रत्येकी ५ लाख रूपये प्रमाणे एकूण १५ लाख रूपये निशिगंधा सहकारी बँकेतून अदा केले होते.

प्रत्यक्षात ऊस गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर यातील तिन्ही वाहन मालक यंत्रणेसह कारखान्याकडे हज़र झाले नाहीत. सहकार शिरोमणीकडे करार करून पैसे घेऊन ते अन्य कारखान्यांकडे ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कारखान्याचे नुकसान व फसवणूक केल्याबाबतची फिर्याद शेती अधिकारी प्रताप थोरात यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली.मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर तिन्ही ठेकेदार पसार झाले होते.त्यानंतर यातील देविदास तरडे याला अटक केली होती. दुसरा आरोपी यशवंत बाळासाहेब लवटे रा.मेडद, ता.माळशिरस याला पोलिसांनी अटक केली आहे.त्यास गुरुवार दि.22/05/2025 रोजी न्यायालयात हज़र केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

कारखान्याच्यावतीने ॲड.बी.व्ही.भादुले यांनी काम पाहिले. सदर गुन्ह्याचा तपास पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनचे पी.आय.श्री.हुंबे व पी.एस.आय.श्री.राऊत हे पुढील तपास करीत आहे.

गेल्या २५ वर्षात सहकार शिरोमणीने कधीही ऊस वाहतूकदार वाहन मालकांविरूद्ध तक्रार दाखल केली नाही. उलट ज्यांच्या टोळ्या पळून गेल्या त्यांना कारखान्याने सर्व कायदेशीर मदत केली. येणारा खर्चही भरला. ज्या कारखान्याकडे करार करून पैसे उचललेले असतात त्याच कारखान्यास ऊस पुरवठा करणे अपेक्षित असतो.परंतु गत हंगामात काही जणांनी सहकार शिरोमणी कडे करार करून अन्य कारखान्यांना ऊस पुरवठा केला. त्यामुळे कारखान्याचे नुकसान आणि फसवणूक झाली आहे.म्हणून पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी लागली. त्या अनुषंगाने पोलिस खात्याने आरोपीस अटक केली त्यामुळे तोडणी वाहतुक ठेकेदारांमध्ये वचक बसेल अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Back To Top