आजचा दिवस गावच्या माती माणसात कारणी लागला : खासदार प्रणिती शिंदे

आजचा दिवस गावच्या माती माणसात कारणी लागला : खासदार प्रणिती शिंदे

खासदार प्रणिती शिंदे यांचा तांबोळे, पोफळी गावाला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या लवकरच सोडविण्याचे दिले आश्वासन

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ मे २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील तांबोळे,पोफळी (पांडवांची) या गावात भेट दिली. या भेटीदरम्यान गावातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या.

यावेळी सावळेश्वर ते पोफळी,पोफळी ते साबळेवाडी रस्ता अतिशय खराब झाला असून नागरिकांना ये जा करण्यासाठी अतिशय त्रास होत आहे या रस्त्याची पाहणी गावकऱ्यांसोबत केली.समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित प्रशासनाशी चर्चा करून लवकरात लवकर त्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

या गावभेट दौऱ्यात मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार,भीमा साखर कारखान्याचे संचालक संभाजी कोकाटे, दाजीसाहेब कोकाटे, मनोज यलगुलवार, संदीप कोकाटे,दिगंबर पवार,बाबुराव कोकाटे,शशिकांत कोकाटे,उज्वला कोकाटे, पोफळीचे माजी सरपंच हणमंत जाधव, साबळेवाडीचे जयवंत जाधव,राजू चव्हाण, संजय कोकाटे,दमण चव्हाण,तलाठी A.B. चांदकोटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top