अपहरण व खुनाचे गंभीर गुन्ह्यात सुमारे ०५ महिन्यांपासून फरारी असलेला मुख्य आरोपी अटक करण्यात पालघर पोलीसांना यश
पालघर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०६/२०२५- घोलवड पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर ११/२०२५ बीएनएस कलम १४० (३), १४० (१), १४२, ३५१ (२), ३ (५), ६१ (२) (अ), १०३ (१), २३८ (अ) प्रमाणे दि. २७/०१/२०२५ रोजी दाखल असलेल्या अपहरण व खुनाचे गंभीर गुन्ह्यात सुमारे ०५ महिन्यांपासून फरारी असलेला मुख्य आरोपी अटक करण्यात पालघर पोलीसांना यश आले आहे .
सदर गुन्ह्यात फिर्यादीचे वडील अशोक रमण धोडी वय ५२ वर्षे, रा. वेवजी काटील पाडा ता.तलासरी, जि.पालघर यांनी अविनाश रमण धोडी याची घरपट्टी रद्द करण्यासाठी वेवजी ग्रामपंचायत येथे अर्ज दिला होता व त्यांचेत जमीनीचे कारणावरुन वाद होता. त्यावरुन आरोपी अविनाश धोडी याने मनात राग धरुन यातील मयत अशोक रमण धोडी हे दि. १९/०१/२०२५ रोजी १६.०० वा. चे सुमारास डहाणू येथुन त्यांचे घरी जात असतांना मौजे वेवजी घाटातील हिलझील डोंगराचे वळणावर आरोपी अविनाश रमण धोडी याने त्याचे इतर साथीदारांसह आपसांत संगनमत करुन अशोक रमण धोडी यांची कार अडवून दमदाटी करून गाडीसह अशोक धोडी यांचे अपहरण करुन त्यांचा खून करुन, पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतदेह व कार असे सरीगांम वाडीयापाडा ता. उमरगांव जि.वलसाड गुजरात येथील पाण्याने भरलेल्या खदाणीत टाकून दिले होते.

सदर गुन्ह्यात यापुर्वी एकुण ०५ आरोपी अटक करण्यात आलेले असुन गुन्हयातील मुख्य आरोपी अविनाश रमण धोडी व इतर ०३ साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरारी होते.
पालघर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी सदर गंभीर गुन्ह्याची योग्य ती दखल घेवुन पालघर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. प्रदिप पाटील यांचे नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करुन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखा पालघर कडील विशेष पथकाने नमुद आरोपी घोलवड, उमरगांव, वापी (गुजरात), दिव दमण, सिलवासा, इंदौर, राजस्थान इत्यादी परिसरात शोध घेवुन बातमीदारांचे मार्फत माहिती मिळवुन सदर गुन्ह्यातील आरोपी अविनाश रमण धोडी,वय रा. वेवजी ता.तलासरी जि.पालघर यास दि.०८/०६/ २०२५ रोजी ०३.२५ वा.मौजे मोरखल, सिलवास येथुन ताब्यात घेतलेले आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास डहाणू च्या उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे करीत आहेत.
सदरची कारवाई पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर विनायक नरळे, डहाणु विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अंकिता कणसे,पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील, स.पो.नि.अनिल व्हटकर, पो.उ.नि.स्वप्नील सावंत देसाई, पो.उ.नि.गोरखनाथ राठोड, पो.उ.नि.रोहीत खोत, श्रे.पो.उ.नि.राजेश वाघ, श्रे.पो.उ.नि.सुनिल नलावडे, पो.हवा. दिपक राऊत, पो.हवा.संदिप सुर्यवंशी, पो.हवा.नरेंद्र पाटील, पो.हवा.कैलास पाटील, पो.हवा.दिनेश गायकवाड, पो.हवा.भगवान आव्हाड, पो.हवा.कपिल नेमाडे,पो.हवा. विजय ठाकुर,पो.हवा.संजय ,पो.ना.कल्याण केंगार, पो.अंम. प्रशांत निकम, पो.अंम.विशाल कडव,पो.अंम विशाल नांगरे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली.

