वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी

वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाच्या जिल्ह्याध्यक्षपदी

कासेगांव / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.13 जून – पंढरपूर तालुक्यातील कासेगांव येथील वसंत दौलतराव देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार) गटाच्या जिल्ह्याध्यक्षपदी निवड झाली आहे.

वसंत देशमुख यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्यची आवड आहे.मोठा जनसंपर्क असलेले ते पंढरपूर तालुक्यातील जेष्ठ नेते आहेत. शुक्रवारी अकलूज येथील शिवरत्न येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या जिल्ह्यध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे पत्र महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, व्यापारी सेलचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे व जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कासेगांव येथे वसंतराव देशमुख यांच्या काणर्यकर्ते मध्ये आनंद उत्सव करण्यात आला.

Leave a Reply

Back To Top