I.A.S रमेश घोलप यांचा विशेष सचिव पेयजल एवं स्वच्छता विभाग झारखंड सरकारचा पदभार स्वीकारल्याने सन्मान

I.A.S रमेश घोलप यांचा विशेष सचिव पेयजल एवं स्वच्छता विभाग झारखंड सरकार चा पदभार स्वीकारल्यामुळे सन्मान

श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज,श्री सन्मती सेवा दल या संस्थांच्यावतीने सत्कार

रांची झारखंड/ ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्राचे सुपुत्र I.A.S रमेश घोलप यांनी नुकताच विशेष सचिव पेयजल एवं स्वच्छता विभाग झारखंड सरकार (अभियान निदेशक जल जीवन मिशन झारखंड) या पदाचा पदभार स्वीकारला.त्यामुळे त्यांचा महाराष्ट्रातून श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज,श्री सन्मती सेवा दल या संस्थांच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

I.A.S रमेश घोलप यांच्या या सत्कार प्रसंगी श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष मिहीर गांधी, डॉ.श्रेणिक शहा,संदेश गांधी, योगेश गांधी, नमन गांधी आणि योगराज गांधी आदींसह श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज,श्री सन्मती सेवा दल या संस्थांचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी रमेश घोलप यांच्यासोबत श्री सम्मेद शिखरजी येथील डाकबंगला येथे विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच आगामी सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या यात्रा संघाच्या समारोप कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आले.

I.A.S रमेश घोलप यांच्यासोबत चर्चा करत असतानाच महाराष्ट्रातील I.A.S आणि I.P.S अधिकारी जे झारखंडमध्ये कार्यरत आहेत या सर्वांना एकत्रित श्री सम्मेद शिखरजी मधुबन येथे कार्यक्रम घेण्याविषयी विचार व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Back To Top