राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत
धुळे,दि.1 जुलै 2025 (जिमाका वृत्तसेवा): पर्यटन व सांस्कृतिक विभागामार्फत सन 2025-2026 या आर्थिक वर्षांसाठी राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे,असे आवाहन जिल्हा स्तरीय समिती सदस्य सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अजय फडोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन योजनेतंर्गत दरमहा 5 हजार मानधन देण्यात येते.या योजनेच्या लाभासाठी पात्र व्यक्तींनी आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन https://mahakalasanman.org/Home.aspx या संकेतस्थळावर जाऊन 1 जुलै ते 31 जुलै 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे.
यासाठी कलावंताचे वय 50 वर्ष पुर्ण असावे, वार्षिक उत्पन्न 60 हजार पेक्षा जास्त नसावे, कलावंताची उपजिवीका मुळ कलेवर अवलंबून असावी. सद्या त्यांना कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असेच योजनेसाठी पात्र असतील असेही सदस्य जिल्हा परिषदेचे सचिव तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अजय फडोळ यांनी कळविले आहे.

