सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचेवतीने पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना शिरा वाटप

भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे हस्ते आषाढी सोहळ्यासाठी आळंदी देहू येथून निघालेल्या जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज व श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालख्यांचे पिराची कुरोली येथे आगमन झाले असता सदर सोहळ्यातील विठ्ठल भक्तांना कारखान्याचे वतीने शिरा वाटप करण्यात आला.
याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर,संचालक सर्वश्री परमेश्वर लामकाने, अमोल माने,अरुण नलावडे,विश्वास उपासे, माजी संचालक सर्वश्री राजाराम माने, पांडुरंग कौलगे, संभाजी बागल, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश देठे, रामचंद्र कौलगे,कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे,कारखान्याचे सर्व खातेप्रमुख व सेवा करणारे कर्मचारी उपस्थित होते.

