हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे

हुलजंतीच्या देवस्थान जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी प्रयत्न करेन : खासदार प्रणिती शिंदे

सोड्डी गावातील वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढणार

मंगळवेढा |ज्ञानप्रवाह न्यूज- सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती आणि सोड्डी गावांना भेट देत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या व निवेदने स्वीकारली.

यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, हुलजंती देवस्थानच्या जमिनीवरील वनविभागाची अधिसूचना रद्द करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.तसेच सोड्डी गावातील वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित कराव्यात यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू.त्याचप्रमाणे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटच्या टप्प्यातील गावांपर्यंत पोहोचवण्या साठी लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून सोड्डी गावात पाणी सोडण्याचे आदेशही दिले.

या गाव भेट दौऱ्यात काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार,युवक अध्यक्ष रविकरण कोळेकर,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यादाप्पा माळी, सावकार, हुलजंतीचे सरपंच सौ.कुरमुक्ते ताई, शिवा कुरमुक्ते सर,गोविंद भोरकडे सर, सोड्डीचे हनुमंत बिराजदार,अप्पू भोरकडे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top