पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजुर करावा- सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे

पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी भाविकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजुर करावा-सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली ही मागणी

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 जुलै – पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी येणार्या पालखी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी भाविकांना चांगल्या प्रकारे सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजुर करणेत यावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी केली आहे.

आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्र राज्यातून विविध संतांच्या पालख्या पंढरपूर येथे येत असतात.पालखी मार्गावर तोंडले बोंडले, दसुर,केसकरवाडी,भाळवणी,पिराची कुरोली, वाडीकुरोली,धोंडेवाडी,उपरी,भंडीशेगांव,शेळवे,खेडभाळवणी, वाखरी,गादेगांव या ग्रामपंचायती आहेत.सदर गावात श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज,जगदगुरु श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचा विसावा असतो व लहान मोठ्या अशा अनेक विविध संतांच्या पालख्या गावात मुक्कामी असतात.सदर ग्रामपंयातींना वारकरी भक्तांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी ग्रामपंचायतीला मिळणारा राज्य शासनाचा निधी अपुरा पडत असल्याने वारकरी भाविकभक्तांची गैरसोय निर्माण होत असते.वारकरी भाविकांना चांगल्या प्रकारे सोयी सुविधा पुरविण्यासाठी सदर ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी मंजुर होणे गरजेचे आहे अशीही मागणी राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे काळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top