लातूरमध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश – उपमुख्यमंत्री अजित पवार

लातूरमध्ये घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले – उपमुख्यमंत्री अजित पवार

छावा संघटनेच्या इतर मागण्यांबाबतही सकारात्मक आणि त्वरित निर्णय घेतला जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२५- आज पुण्यात छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी लातूरमध्ये घडलेल्या घटनेची सर्व तपशीलवार माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली.त्यांच्या तक्रारी अत्यंत गांभीर्याने ऐकून घेत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ लातूरच्या पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

तसेच छावा संघटनेच्या इतर मागण्यां बाबतही सकारात्मक आणि त्वरित निर्णय घेतला जाईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छावा संघटनेच्या पदाधिकार्यांना दिला आहे .

Leave a Reply

Back To Top