बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये खासदार प्रणिती शिंदे यांची निवड

सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०७/२०२५ – अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या शिफारसीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्य असलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्क्रिनिंग कमिटीमध्ये (उमेदवार छाननी समिती) नियुक्ती करून त्यांना आणखी एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर पक्ष नेतृत्वाने यापूर्वी कर्नाटक आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांमध्येही जबाबदारी सोपवली होती ती त्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडली होती.गुजरात विधानसभा निवडणुकीतही त्यांना वलसाड जिल्ह्याचे निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली तेथेही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

याच अनुभवाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी स्थापना केलेल्या स्क्रिनिंग कमिटीत (उमेदवार छाननी समिती) सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांची निवड केल्याबद्दल अभिनंदन केले जात आहे.

सर्वजण मिळून बिहारमध्ये काँग्रेस पक्षाची संघटनात्मक जबाबदारी सक्षमपणे पार पाडून पक्षाच्या विजयासाठी नक्कीच प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Reply

Back To Top