महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगावर बोलू काही हा कार्यक्रम संपन्न

उद्योगावर बोलू काही….मार्गदर्शन संपन्न..

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगावर बोलू काही कार्यक्रम संपन्न

मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील सचखंड दरबार हॉल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योगावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी या मार्गदर्शन शिबिराला उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन मनसे शाखा अध्यक्ष संदीप वरे आणि सहकार सेनेचे उपाध्यक्ष वैभव भोर यांनी केले होते.

कार्यक्रमास सॉफ्ट स्किल प्रशिक्षक प्रकाश मोहिते यांनी मार्गदर्शन केले.यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, मनसे उपाध्यक्ष सत्यवान दळवी,सहकार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विजय जाधव,विभाग अध्यक्ष राजेश चव्हाण,सहकार सेनेच्या प्रदेश सरचिटणीस अनिषा ताई माजगावकर, माजी नगरसेविका वैष्णवी ताई सरफरे,माजी नगरसेविका प्रियंका शृंगारे, कांदिवली विभाग अध्यक्ष आणि सहकार सेनेचे उपाध्यक्ष महेश फरकाशे,सायली दळवी,जयश्रीताई भिंताडे, राजेंद्र काळे,अनिल जोगळेकर,मुनावर शेख, सुधीर पवार,संजय धावरे,संतोष कदम, संजय आडारकर,जयंत पाटील,प्रसाद शेट्टे, महेश धामापूरकर, दिनकर शिंदे,दिनेश साळवी,महिला उपविभाग अध्यक्ष कल्पना राणे,शाखा अध्यक्ष विमल लोखंडे, राकेश परदेशी,हितेश गुरव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top