सहकार शिरोमणी कारखान्याच्या मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम संपन्न
दहा दिवसात उर्वरीत ऊस बिले शेतकऱ्यांचे खातेवर जमा करणार-कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे
भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 च्या 27 व्या गळीत हंगामातील मिल रोलरचे पुजन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक पोपट ज्ञानेश्वर घोगरे यांचे हस्ते करण्यात आले.

गळीत हंगाम 2025-26 मध्ये सुमारे 5.50 लाख मे.टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने कारखान्याचे मशिनरीचे देखभाल दुरुस्तीची कामे अंतीम टप्यात आली असल्याचे कार्यकारी संचालक पी.डी. घोगरे यांनी सांगितले.यंदाच्या गळीत हंगामा मध्ये अपेक्षित उदिष्टय् साध्य करण्यास 192 ट्रॅक्टरचे,130 बजॅट, 300 बैलगाडी व 03 हार्वेस्टर याप्रमाणे करार करुन ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सज्ज् ठेवण्यात आली आहे.ऊस पुरवठादार शेतकऱ्यांची उर्वरीत बिले 10 दिवसाच्या आत त्यांच्या बँक खातेवर जमा करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

यावेळी कारखान्याचे टेक्निकल जनरल मॅनेजर पी.टी.तुपे, प्रोडक्शन मॅनेजर व्ही.डी. आडत,शेती अधिकारी पी.आर. थोरात, चिफ अकौंटंट बी.एस.सोनवले,परचेस ऑफिसर सी.जे.कुंभार, केनयार्ड सुपरवायझर डी.डी. काळे,स्टोअर किपर जे.एच.मुजावर,हेड टाईम किपर एस.आर. काळे,ऊस पुरवठा अधिकारी एच.आर.गिड्डे, कार्यालयीन अधिक्षक डी.एम.कुंभार,चिफ इंजिनिअर अे.डी.पांढरे, इन्स्ट्रमेट इंजिनिअर यु.टी.फाटे, इले.इंजिनिअर एन.एस. कुंभार, गोडावुन किपर के.एस.माने,सुरक्षा अधिकारी बी.एस. पिसे, सभासद शेतकरी,तोडणी वाहतुक ठेकेदार,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

