चौफाळा येथील गोपाळ कृष्ण मंदिरात कृष्णाष्टमीचा सोहळा संपन्न
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज /नंदकुमार देशपांडे – कृष्णाष्टमीच्या जन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात येथील चौफळा श्रीकृष्ण मंदिरात भल्या पहाटे संपन्न झाला. या मंदिरात पुरातन भगवान श्रीकृष्णाची मूर्ती असून देऊळही हे श्री बडवे यांच्या मालकीचे आहे .

या कृष्ण मंदिरात बडवे कुटुंब व परिसरातील फुलमाळी तसेच या भागातील विक्रेते यांच्यासह सर्वजण कृष्णाष्टमीच्या सोहळ्यात सहभागी होतात.मंदिरावर विद्युत रोषणाई तसेच फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आहे.पहाटे श्रीकृष्णास पियुष बडवे,सागर बडवे,पप्पू बडवे,सुभाष बडवे आणि परिवाराच्यावतीने पंचामृताचा महाअभिषेक श्री गोपाळ कृष्ण करण्यात आला.यावेळी इतरही भाविकांनी श्रीकृष्ण पंचामृताचा अभिषेक केला.या अभिषेका नंतर श्रीकृष्णाच्या दर्शनाकरता देऊळ खुले करण्यात आले पहाटे पाच वाजल्यापासूनच दर्शनासाठी व कृष्णाष्टमीच्या सोहळ्यासाठी रांग लागली होती.

श्री गोपाळकृष्ण महा अभिषेक झाल्यानंतर विविध भक्तांनी तसेच बडवे कुटुंबाच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारी श्रीकृष्णास नैवेद्य दाखवण्यात आला. गोपाळ कृष्ण मंदिरात दुपारी महिलांचा भजनी मंडळाचा कार्यक्रम सायंकाळी भजनी मंडळाचा कार्यक्रम तसेच इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. भजन व आरती झाल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास कृष्णाच्या जन्माष्टमी सोहळ्या निमित्त कृष्ण मंदिराच्या आतील भागात दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला.


