बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माधवी कुसुमडे यांची बिनविरोध निवड

बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी माधवी कुसुमडे यांची बिनविरोध निवड

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०८/२०२५ – बोहाळी ता.पंढरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमदार समाधान आवताडे गटाच्या माधवी कल्याण कुसुमडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालय येथे माधवी कुसुमडे व कल्याण कुसुमडे यांचा सत्कार करण्यात आला

बोहाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडीसाठी सरपंच शिवाजी पवार व ग्रामपंचायत अधिकारी श्री.म्हमाणे यांच्या उपस्थितीत मंगळवार दि.26 ऑगष्ट रोजी सभा घेण्यात आली. यावेळी उपसरपंचपदासाठी माधवी कल्याण कुसुमडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

माधवी कल्याण कुसुमडे यांची उपसरपंचपदी निवड झाल्या बद्दल त्यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला आणि गुलालाची उधळण करत ग्राममस्थांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी सरपंच शिवाजी पवार, माजी उपसरपंच जगन्नाथ जाधव, बाळासाहेब जाधव, राणी जाधव, वैशाली शिंदे ग्रा.पं. सदस्य राजेश कुसुमडे, आकाश चंदनशिवे, मोनाली घोडके, शुभांगी कुंभार तसेच नानासाहेब जाधव, विठ्ठल पाटील, मधुकर कुसूमडे, धर्मराज कुसूमडे, बंडु जाधव, जालिंदर कुसूमडे,पै.सतीश कुसुमडे, विक्रम चंदनशिवे, नागेश घोडके, सर्जेराव जाधव, अण्णा जाधव, बाळासाहेब जाधव, सुधाकर पाटील, पंजाब पवार, सोमनाथ कुसूमडे, अनंता खुळे, दादा कुसूमडे, चंद्रकांत कुसूमडे, ग्रामपंचायत अधिकारी श्री.म्हमाणे आदी उपस्थित होते.

परिचारक गटाचे भास्कर कसगावडे यांच्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सहकार्य केल्याने उपसरपंचपदी माधवी कुसूमडे यांची बिनविरोध निवड झाली .

Leave a Reply

Back To Top