शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे

भटक्या जमाती व विमुक्त जाती लाभार्थी विद्यार्थ्यांना 137 प्रमाणपत्रांचे वाटप

तहसील कार्यालय पंढरपूर चा उपक्रम

शासनाच्या विविध योजनांचा लाभ पोहचवू – प्रांताधिकारी सचिन इथापे

पंढरपूर/ उमाका / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ : तहसील कार्यालय पंढरपूर तालुका प्रशासनातर्फे विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शेतकी भवन पंचायत समिती येथे कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात जातीचे दाखले,रहिवासी प्रमाणपत्र, उत्पनाचा दाखला,रेशन कार्ड,दिव्यांग प्रमाणपत्र असे एकूण 137 प्रमाणपत्र प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसिलदार सचिन लंगुटे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, निवासी नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड आणि निवडणूक तसेच महसूल नायब तहसीलदार व्ही.व्ही.बुचके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

प्रांताधिकारी सचिन इथापे म्हणाले की,राज्य शासनामार्फत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या कल्याणासाठी विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत.भटक्या जमाती म्हणजे अशा समाज घटकांचा समूह की जे पारंपारिक पद्धतीने एकाच ठिकाणी न राहता त्या स्वरूपात आपला उदरनिर्वाह करत असतात.महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गांची संख्या लक्षणीय आहे.त्यांच्या जीवनशैलीमुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी अशा कार्यक्रमांच्या आयोजन करणे आवश्यक असल्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी भटक्या व विमुक्त समाजातील कोर्टी गावचे सरपंच राजू पवार, सामाजिक कार्यकर्ते लखन चौगुले,कैकाडी समाजाचे नितीन यादव,सामाजिक कार्यकर्ते रामा चौगुले,दादा पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून भटक्या व विमुक्त जातीतील नागरिक उपस्थित होत.

यावेळी जातीचा दाखला प्रमाणपत्र -19, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र -7, रहिवासी प्रमाणपत्र -21, उत्पन्नाचा दाखला -36, रेशन कार्ड -27, संजय गांधी व श्रावण बाळ मंजूर लाभार्थी-10, आयुष्यमान भारत कार्ड- 15, दिव्यांग प्रमाणपत्र 2 असे एकूण 137 प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Back To Top