जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व तालुका स्तरीय कक्ष-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हास्तरीय नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष व तालुका स्तरीय कक्षाची स्थापनाजिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करून पूरग्रस्त बाधितांसाठी मदत देण्याचे आवाहन

दानशूर व्यक्ती, नागरिक, संघटना व संस्था यांनी बाधितांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नाही

प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या किट प्रमाणे मदत करावी किंवा आपल्या इच्छेप्रमाणे जी पाहिजे ती मदत बाधितांसाठी करू शकता

सोलापूर,दिनांक 26 (जिमाका):- सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त व पूर परिस्थितीमुळे पुरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे वतीने जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी सोलापूर येथे नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तर तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आलेली असून ज्या दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांना पूरग्रस्त बाधितांना मदत करावयाची आहे त्यांनी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय मदत कक्षाशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

जिल्ह्यातील नुकसानग्रस्त व पुरग्रस्तांच्या सार्वजनिक हितासाठी नागरिकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यांत या उद्देशाने मदत कक्ष स्थापन करण्यात आला असून मदत कक्षामार्फत आवश्यक ती मदत करुन बाधित नागरिकांचे प्रश्न तात्काळ कार्यवाहीसाठी संबंधित विभागांशी संपर्क साधून सोडविण्यात येतील.या मदत कक्षाच्या माध्यमातून 88 बाधित गावांपैकी कोणत्या गावाला कोणत्या प्रकारची मदतीची आवश्यकता आहे याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे गरजू बाधित ग्रस्तांना केलेली मदत तात्काळ देणे सोयीचे होणार असल्याचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.तसेच पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हास्तरीय मदत कक्ष अधिकारी व संपर्क क्रमांक :-

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला असून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार सैपन नदाफ मो.क्रमांक 83799 81799 तर दूरध्वनी क्रमांक 0217-2990140 यावर संपर्क साधावा.

तालुकास्तरीय मदत कक्षाचे अधिकारी व संपर्क क्रमांक:-

उत्तर सोलापूर तालुक्यात सुधाकर बंडगर, निवडणूक नायब तहसिलदार मोबाईल क्रमांक 9881741311, कार्यालयीन क्रमांक 0217-2731014
माढा तालुक्यात प्रितम पवार पुरवठा निरीक्षक मोबाईल क्रमांक 9970827574, कार्यालयीन क्रमांक 02183-234031; करमाळा तालुका शत्रुघ्न चव्हाण पुरवठा निरीक्षक मोबाईल क्रमांक 8805907686, कार्यालयीन क्रमांक 02182-220535; बार्शी तालुक्यात संतोष गुलाब शिंदे पुरवठा निरीक्षक मोबाईल क्रमांक 9518562532, कार्यालयीन क्रमांक 02184-222213; अपर तहसिल मंद्रुप येथे नवल सरवळे सहा. महसूल अधिकारी मोबाईल क्रमांक 9309597368;
दक्षिण सोलापूर तालुक्यात विनायक कुलकर्णी निवडणूक नायब तहसिलदार मोबाईल क्रमांक 9423331657, कार्यालयीन क्रमांक 0217-2731033
तर मोहोळ तालुक्यात श्रीमती सोनाली निटुरे पुरवठा निरीक्षण अधिकारी मोबाईल क्रमांक 9022008681, कार्यालयीन क्रमांक 02189-232234.नागरिकांनी पूरग्रस्त मदतीसाठी संबंधित तालुक्याच्या या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधीत कुटुंबाना शासनातर्फे किट वाटप करण्यात येत आहे.या किट मध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे – ज्वारीचे पीठ,आटा,हरभरा दाळ,स्वयंपाक तेल,मीठ,तिखट मसाला, हळद,दूध पावडर, मेणबत्ती पाकीट मध्यम आकाराचे,मच्छर अगरबत्ती,काडीपेटी,टॉर्च विथ बॅटरी, इमरजन्सी लाईट,अंगाचे साबण,प्लास्टीक ताडपत्री,चादर, सतरंजी तसेच पातेलं,तवा,ताट,तांबे,वाटी, चमचा, ग्लास, उलतन,पक्कड/सांडशी,पळी आमटी वाढण्यासाठी,प्लास्टीक बकेट अशा आवश्यक मूलभूत वस्तूंचा समावेश आहे.

या वस्तूंनाच अधिक प्राधान्य असून याव्यतिरिक्तही व्यक्ती, सामाजिक संस्था पूरग्रस्त बाधित नागरिकांना जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मदत कक्ष व तालुकास्तरीय मदत कक्ष यांच्याकडे मदत देऊ शकतात, असेही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Back To Top