भारतीय वाघिणींचा विश्वविजय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भारतीय वाघिणींचा विश्वविजय- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उत्कंठावर्धक लढतीत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत महिला विश्वचषक क्रिकेट २०२५ वर भारताची मोहोर

Indian Tigresses Triumph! Team India Clinches ICC Women’s Cricket World Cup 2025 with a Stunning Win Over South Africa

भारतीय वाघिणींनी उत्कंठावर्धक सामन्यात केली दक्षिण आफ्रिकन टीमचा धुव्वा उडवत महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेवर उमटवली मोहोर…

उत्तुंग सांघिक कामगिरीने मिळवलं ऐतिहासिक यश…

मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज –आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा’२०२५ च्या अंतिम सामन्यात टाॅस जिंकत दक्षिण आफ्रिकन महिला संघाने भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय रणरागिणींनी धावांचे उद्दीष्ट दक्षिण आफ्रिकन संघासमोर ठेवले. त्यात प्रामुख्याने शेफाली वर्मा ८७, दिप्ती शर्मा ५८, स्मृती मनधाना ४५ तसेच रिचा घोष, जेमिमा राॅड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने त्यांना दिलेली खंबीर साथ यामुळे भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकन संघासमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले.

त्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा यांनी आफ्रिकन फलंदाजीला खिंडार पाडले आणि इतर भारतीय महिला गोलंदाजांनी त्यांना साजेशी साथ दिली.

उत्तम सांघिक कामगिरीने भारतीय महिला क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी करत आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा ‘२०२५ पटकावला. समस्त भारतीय महिला क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वविक्रमी भारतीय महिला संघाला दिल्या.

Leave a Reply

Back To Top