माय भारत ॲपद्वारे युवकांना रोजगार,कौशल्य आणि संधींचे नवे दालन –केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया


१७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम उत्साहात पार –युवकांना डिजिटल भारताशी जोडण्याचे आवाहन

My Bharat App to Empower Youth with Jobs, Skills and Opportunities – Union Minister Dr. Mansukh Mandaviya

17th Tribal Youth Exchange Programme Inspires Leadership and National Unity Among Youth
१७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम उत्साहात
मुंबई,दि.३ : युवकांनी २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी योगदान द्यावे. तसेच, युवकांना रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी माय भारत पोर्टल मार्गदर्शक ठरणार आहे.या पोर्टलद्वारे युवकांना नोकरीच्या संधी,कौशल्य विकास, ऑनलाईन स्पर्धा तसेच काम आणि विचारांची देवाणघेवाण यासंबंधीची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल. युवकांनी डिजिटल उपस्थिती वाढवून या पोर्टलचा सक्रिय वापर करावा, असे आवाहन केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी केले.

गृह मंत्रालयाच्या सहकार्याने युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय आणि महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या समन्वयाने पोलीस प्रशिक्षण केंद्र, मरोळ, येथे १७ वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम पार पडला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण विभाग) प्रवीण कुमार पडवळ, जिल्हा युवा अधिकारी (माय भारत,मुंबई) अनुप इंगोले,पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवींद्र दळवी आणि ज्युडो कार्यक्रम समन्वयक यतिन बांगरा आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाचा उद्देश आदिवासी युवकांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित करणे आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन अनुप इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत करण्यात आले. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त फुलसिंग पवार यांनी प्रेरणादायी व्याख्यान दिले.यावेळी गृह मंत्रालयाच्या अवर सचिव पिंकी राणी,पोलीस विभागा तील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सहभागी युवक-युवतींनी अभिप्राय सत्रात आपले अनुभव सांगितले.

यावेळी सांस्कृतिक व भाषण स्पर्धेतील विजेत्यांचा चषक देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम आदिवासी युवकांमध्ये राष्ट्रीय एकता, नेतृत्व व सांस्कृतिक जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने यशस्वीरीत्या संपन्न झाला अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी अनुप इंगोले यांनी दिली.

