नवले पुलाला सुरक्षित करण्याची वेळ संपली आता फक्त कृती हवी- डॉ. नीलम गोऱ्हे

नवले पुल दुर्घटनेवर तातडीची कारवाई करा;अभियांत्रिकी सुधारणा आणि क्रिटिकल ब्लॅक स्पॉट घोषित करण्याची
डॉ.नीलम गोऱ्हे यांची मागणी

सहा जीव गेले, २२ जखमी,नवले पुलाला क्रिटिकल झोन घोषित करण्याची तसेच Emergency Highway Station उभारण्याची डॉ. गोऱ्हे यांची मागणी

NH-48 वर सुरक्षिततेचा कणा मजबूत करा – उपसभापतींचे आवाहन

ब्लॅक स्पॉट की डेथ झोन? नवले पुलासंदर्भात गंभीर चित्र

पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ नोव्हेंबर २०२५-पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48) वरील नवले पुल परिसरात १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातानंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्र व राज्य सरकारकडे तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाय योजनांची मागणी केली आहे.

डॉ.गोऱ्हे यांनी नवले हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली.हॉस्पिटल संचालक डॉ.अरविंद भोरे तसेच आपत्कालीन विभाग प्रमुख डॉ.सीमा कऱ्हाडे यांच्या तत्पर सेवांचे त्यांनी कौतुक केले. ससून रुग्णालयातील सुपरिटेंडंट डॉ. यल्लप्पा जाधव यांच्याकडून सतीश वाघमारे आणि सय्यद या रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेतली.त्या म्हणाल्या, जखमी रुग्णांचे पुढील उपचार,स्थानांतरित केलेली हॉस्पिटल्स आणि लागणारी मदत यांची संपूर्ण माहिती गोळा करून सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.

नवले पुल-सततची अपघातांची मालिकाच

या अपघातात तीन वर्षांच्या बालकासह ६ जणांचा मृत्यू झाला तर २२ जण गंभीर जखमी झाले. दोन कंटेनर आणि एक कार जळून खाक झाली.नवले पुल परिसर गेल्या काही वर्षांपासून धोकादायक ब्लॅक स्पॉट म्हणून ओळखला जातो.

गेल्या घटनांची मालिका:

३० नोव्हेंबर २०२० — ट्रेलर ब्रेक-फेल
२० नोव्हेंबर २०२२ — ४८ वाहनांची पाइल-अप
१७ ऑक्टोबर २०२३ — ट्रकला आग
०३ मे २०२५ — ब्रेक-फेल अपघात
१३ नोव्हेंबर २०२५ — कंटेनर-कार दुर्घटना
यामध्ये मिळून १६ मृत, ६०–७० जखमी नोंदवले गेले आहेत.

डॉ. गोऱ्हे यांच्या प्रमुख मागण्या-

नवले पुलाला ‘Critical Black Spot’ घोषित करणे,उताराची पुनर्रचना,अँटी-स्किड पृष्ठभाग,Arrester Bed / Runaway Truck Ramp,स्मार्ट सिग्नलिंग,LED चेतावणी फलक, रंबल स्ट्रिप्स,जड वाहनांसाठी स्वतंत्र लेन
महामार्ग सुरक्षा प्रणाली बळकटीकरण
डिजिटल ब्रेक-टेस्ट प्रमाणपत्र अनिवार्य
GPS स्पीड गव्हर्नर पालन
रात्री जड वाहनांवर विशेष नियंत्रण
CNG/LPG वाहनांसाठी सुरक्षा प्रोटोकॉल
Navale Corridor Safety Audit ३० दिवसांत जारी करणे
MoRTH–NHAI–IIT/COEP–पोलिस यांच्या संयुक्त समितीद्वारे.
आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली सुधारणा
NH-48 वर Emergency Response Rapid Station
24×7 अँबुलन्स, फायर युनिट, रेस्क्यू टीम
गोल्डन अवर समन्वयासाठी PMC–ससून–आरोग्य विभाग–हायवे कंट्रोल समन्वय
पीडितांना तातडीची मदत
मोफत शस्त्रक्रिया
ट्रॉमा–रीहॅब सुविधा
आर्थिक मदत व कायदेशीर सहाय्य

Leave a Reply

Back To Top