मोबाईल हरवल्यास काय कराल ?(CEIR Portal एक महत्त्वाची सेवा)

सायबर पोलीस ठाणे पालघर – मोबाईल हरवल्यास काय कराल? (CEIR Portal एक महत्त्वाची सेवा)

मोबाईल हरवला? चोरीला गेला? घाबरू नका… आता मिळू शकतो परत

सायबर पोलीस ठाणे, पालघर यांनी नागरिकांसाठी CEIR PORTAL (Central Equipment Identity Register) संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. चोरी/हरवलेला मोबाईल शोधणे, ब्लॉक करणे आणि पुन्हा ॲक्टिव्ह करणे आता अधिक सोपे झाले आहे.

तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया

  1. जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवा.
  2. मोबाईलचा IMEI नंबर ब्लॉक करण्यासाठी CEIR पोर्टलवर नोंदणी करावी.
  3. लिंक: https://www.ceir.gov.in
  4. यामध्ये Block Stolen / Lost Mobile या लिंकवर जाऊन आवश्यक माहिती Submit करावी.
  5. तक्रारपत्र, मोबाईलची खरेदी बिल किंवा मालकीचा पुरावा (500 KB पेक्षा कमी साइज) अपलोड करावा.
  6. नंतर CEIR कडून Request ID नंबर मिळेल.

मोबाईल परत मिळाल्यास पुढील प्रक्रिया

मोबाईल सापडल्यास CEIR कडून आलेला SMS वापरून IMEI पुन्हा Active करणे शक्य होते.
यासाठी नागरिकांनी पोलीस स्टेशनला माहिती द्यावी.

सायबर फसवणूक झाली असल्यास त्वरित संपर्क करा:
https://cybercrime.gov.in
टोल फ्री: 1930 / 1945

Leave a Reply

Back To Top