पंढरपूरमध्ये निवडणूक रणधुमाळी ; भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शामल शिरसट यांच्या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
संत पेठ भागात शिरसट यांची शक्तीप्रदर्शन रॅली; भाजपचा विकासाचा नारा पुन्हा चर्चेत
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज– पंढरपूर शहरात निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. भाजपकडून नगराध्यक्षा पदासाठी उमेदवार असलेल्या सौ.श्यामल लक्ष्मण शिरसट यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.शिस्तबद्ध आणि सुयोजित प्रचारामुळे शिरसट यांनी जनमानसात वेगळी छाप पाडली आहे.

मंगळवार दि.२५ नोव्हेंबर रोजी सकाळी प्रदक्षिणा मार्ग, कालिकादेवी चौक,भाई भाई चौक ते संत पेठ परिसरात शिरसट समर्थकांनी भव्य रॅली काढली. ढोल- ताशांच्या गजरात, हलगींच्या नादात आणि जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.
केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्याचा फायदा पंढरपूरच्या विकासकामांना मिळेल,असा विश्वास भाजपचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक, लक्ष्मण शिरसट, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ.शामल लक्ष्मण शिरसट, माजी नगरसेवक राजू सर्वगोड, माजी नगरसेवक इब्राहीम बोहरी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांच्या उत्साहामुळे निवडणूक वातावरणात रंगत वाढली आहे. या निघालेल्या रॅलीत मोठ्या संख्येने महिला, तरुण व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले.

