शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे पुण्यस्मरण- शौर्यचक्र विजेते मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबीयांतर्फे दहा मानकरींचा सन्मान

शहीद मेजर कुणाल गोसावी यांचे नववे पुण्यस्मरण वाखरी येथे भावपूर्ण वातावरणात साजरे

शौर्यचक्र विजेते मेजर कुणाल गोसावी यांच्या कुटुंबीयांतर्फे दहा मानकरींचा सन्मान

देशभक्तीचा अनोखा संदेश; विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप व एनसीसी कडून मानवंदना

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – शौर्यचक्र प्राप्त भारत माता पुत्र शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या नवव्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम शनिवार रोजी वाखरी येथील शहीद स्मारकावर मोठ्या श्रद्धा व सन्मानाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून भा.प्र.से.सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे,ब्रिगेडियर श्री बोधे, कॅप्टन कोडग जिल्हा सैनिक कार्यालय सोलापूर, मेजर खांडेकर, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बळीराम चौगुले,युवा नेते प्रणव परिचारक,स्वेरी इंजीनियरिंग कॉलेजचे संस्थापक सचिव बी.पी.रोंगे सर तसेच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य बळवंत सर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व शहीद स्मारकाला मानवंदना देऊन झाली. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या एनसीसी पथकाने राष्ट्रगीत सादर करून शहीदांना सलामी दिली.मान्यवरांच्या हस्ते शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये दिव्या धनाजी कोळेकर,अंबिका मनोज हलकरे, प्रियंका विनोद पवार, योगिता रामकृष्ण देशमुख,अमरजा विजय दरेकर,सुवर्णा अप्पाराव कांबळे धाराशिव, राणी दिगंबर बेडगे, पुनम योगेश गुरव, रूपाली भगत, लक्ष्मी पांढरे सांगली– मंगळवेढा आदी दहा कुटुंबीयांचा शाल, श्रीफळ, ट्रॉफी व धनादेश देऊन सन्मान करण्यात आला.

गावकऱ्यांसह गोसावी समाज,अंधशाळा पंढरपूरचे कर्मचारी, अनेक भक्त व देशभक्त उपस्थित होते. बालवयापासूनच देशप्रेम निर्माण करण्याच्या हेतूने महेश भोसले सर यांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणले होते. सामाजिक उपक्रम म्हणून नाथ चौक येथील कवठेकर प्रशाला येथे 4,000 वह्यांचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश बुवा सर यांनी केले. आभार महेश म्हेत्रे यांनी मानले.

हा कार्यक्रम शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरपिता मुन्नागीर गोसावी, वीरमाता वृंदादेवी गोसावी तसेच अमित, समीर, महेश गोसावी आणि सर्व गोसावी कुटुंबीय उपस्थित होते. हा कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.

Leave a Reply

Back To Top