ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नारायण शिंदे यांचे हृदयविकाराने निधन
पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज– पंढरपूर शहरातील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नारायण शिंदे यांचे मंगळवारी सकाळी 6.30 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले.त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत्यू समयी ते ७८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.ते पत्रकार नितीन शिंदे तसेच उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक श्रीनिवास शिंदे यांचे वडील होत.

