मतदान करण्याच्या कोणत्याही ईव्हीएम मशीनवरील चिन्हावर पेनने खुणा नाहीत -निवडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर

मतदान करण्याच्या कोणत्याही ईव्हीएम मशीनवरील चिन्हावर पेनने खुणा नाहीत -निवडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर

मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३ : पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिये दरम्यान ‘ईव्हीएम (EVM) मशीनवरील चिन्हावर पेनाने खुना केल्या आहेत या आशयाचे वृत्त काही प्रसारमाध्यमांतून प्रसारित होत आहे.यावर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अधिकृत खुलासा केला असून,मतदान करण्यापुर्वी काही लोक सही ऐवजी अंगठा करतात त्या अंगठ्याला लागलेली शाई मतदान यंत्राला लागल्याचे दिसून येत होती.यंत्रावरील शाई तात्काळ पुसण्यात आली.मतदान करण्याच्या कोणत्याही ईव्हीएम मशीनवरील चिन्हावर पेनने खुणा नाहीत. मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि निवडणूक आयोगाच्या नियमांनुसारच करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनी दिली.

दि २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सर्व उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीनचे सेटिंग व सिलिंग करण्यात आले होते.त्याबरोबर राखीव मशीन्स देखील २८ नोव्हेंबरलाच तयार करण्यात आल्या होत्या.निवडणूक आयोगाकडील मार्गदर्शक सूचना व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. प्रभाग 7 मधील जागा ब चा निवडणूक कार्यक्रम 4 डिसेंबर ला सुरु होत असून 20 तारखेला मतदान होणार असून पंढरपूर नगरपरिषदेसाठी निडणूक लढवलेल्या सर्व उमेदवारांची व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची एकत्रित मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे होणार आहे .

नागरिकांनी व उमेदवारांनी कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नये,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Back To Top