देशात लागू होणार इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली; FASTag होणार आणखी अत्याधुनिक

एक वर्षात देशातून टोल नाका पद्धत संपणार; नितीन गडकरींची लोकसभेत घोषणा

देशात लागू होणार इलेक्ट्रॉनिक टोल प्रणाली; FASTag होणार आणखी अत्याधुनिक

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. देशातील सध्याची टोल वसुली प्रणाली एक वर्षाच्या आत पूर्णपणे समाप्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याऐवजी देशभरात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टम लागू केली जाणार आहे.

गडकरी म्हणाले,ही टोल सिस्टम लवकरच संपणार आहे. टोलच्या नावावर तुम्हाला कोणीही अडवणार नाही.एका वर्षात संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन लागू होईल.

केंद्रीय मंत्री यांनी सांगितले की देशभरात सध्या 10 लाख कोटी रुपयांच्या 4,500 महामार्ग प्रकल्पांवर काम सुरू आहे. नवीन तंत्रज्ञानामुळे महामार्ग प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि अखंडित होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

FASTag प्रणाली अधिक सक्षम होणार

हायवेवरील टोल व्यवस्थेला अधिक आधुनिक आणि कार्यक्षम करण्यासाठी नेशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नेशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) प्रोग्राम विकसित केला आहे.

ही प्रणाली FASTag वर आधारित असून ती RFID (Radio Frequency Identification) तंत्रज्ञान वापरते. वाहनाच्या विंडशील्डवर लावलेल्या या टॅगमुळे टोल प्लाझावर गाडी न थांबवता टोल रक्कम थेट लिंक केलेल्या खात्यातून आपोआप वजा होते.सरकारचे उद्दिष्ट या प्रणालीचा देशभर योग्य विस्तार करून पूर्णपणे रोखविरहित आणि अखंडित टोल कलेक्शन सुरू करणे आहे.

Leave a Reply

Back To Top