पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संकलनाची प्रारंभिक आकडेवारी जाहीर
१५७३ पदवीधर आणि ७६२ शिक्षक मतदारांची नोंदणी पूर्ण
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,०५/१२/२०२५ –पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी मंगळवेढा तालुक्यातील मतदार नोंदणीची प्रारंभिक प्रक्रिया सुरू असून गुरुवार दि.०५ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार यावर्षी मतदारांची नोंदणी उत्साहात सुरू आहे. तहसीलदार कार्यालयात २८ डिसेंबरपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी एम.एस.पाटील यांनी दिली.

पदवीधर मतदारांमध्ये १५७३ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ३१७ महिला आणि १२५६ पुरुष मतदारांचा समावेश आहे. शिक्षक मतदारांमध्ये एकूण ७६२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ११६ महिला आणि ६४६ पुरुष मतदार आहेत. ही आकडेवारी स्थानिक नागरिकांचा वाढता सहभाग दर्शवणारी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान नागरिकांनी २८ डिसेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी १२ जानेवारी रोजी प्रसिद्ध होईल, अशी माहिती पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघाचे पदनिर्देशक अधिकारी तथा मंगळवेढाचे तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.




