अध्यापक विद्यालय पंढरपूरची AdhyapakVidyalaya Pandharpur DLEDFieldVisit डी.एल.एड. अभ्यासक्रमांतर्गत क्षेत्रभेट संपन्न : शैक्षणिक, ऐतिहासिक व औद्योगिक स्थळांना विद्यार्थ्यांची भेट
अध्यापक विद्यालय पंढरपूरच्या डी.एल.एड. अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी सिद्धेश्वर मंदिर माचनूर, पी.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिद्धापूर, साखर कारखाना व मंगळवेढा येथील रिद्धी-सिद्धी गणपती मंदिरास शैक्षणिक क्षेत्रभेट देत प्रत्यक्ष अनुभवातून अध्ययन केले.
पंढरपूर | ज्ञानप्रवाह न्यूज –दि.२९ डिसेंबर रोजी अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे डी.एल.एड.अभ्यासक्रमांतर्गत शैक्षणिक उपक्रम म्हणून क्षेत्रभेट दौरा उत्साहात संपन्न झाला.शिक्षक व्यक्तिमत्व विकास व विविध विषयांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आयोजित या क्षेत्रभेटीत अध्यापक विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निरीक्षण व अनुभवाधारित अध्ययन केले.

या दौऱ्याची सुरुवात माचनूर येथील ऐतिहासिक सिद्धेश्वर मंदिर येथे करण्यात आली. येथे विद्यार्थ्यांनी मंदिराचा इतिहास, स्थापत्यकला व सांस्कृतिक वारसा याबाबत सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर पी.एम.श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सिद्धापूर येथे भेट देऊन शाळेतील भौतिक सुविधा,शैक्षणिक गुणवत्ता,परिसर,विविध प्रयोगशाळा तसेच शालेय रजिस्टर यांचा अभ्यास केला.

यानंतर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व कमी कामगारांमध्ये कार्यरत असलेल्या साखर कारखान्याला भेट देण्यात आली. येथे कारखान्याची कार्यपद्धती, यंत्रणा व उत्पादन प्रक्रिया याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. पुढे मंगळवेढा येथील प्रसिद्ध रिद्धी-सिद्धी गणपती मंदिर येथे भेट देत विद्यार्थ्यांनी तेथील कलाकृती व धार्मिक परंपरेचा अनुभव घेतला.

या क्षेत्रभेटीत अध्यापक विद्यालयाचे सर्व विद्यार्थी व शिक्षकवर्ग सहभागी झाला होता. विविध स्थळांवर संबंधित पुजारी, मुख्याध्यापक,शिक्षक तसेच कारखान्याचे वरिष्ठ अधिकारी श्री.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव सु. र. पटवर्धन,संस्थेचे सदस्य एस. पी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एच.आर. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच श्री. गंगथडे सर, हरिदास सर, सौ.पाटील मॅडम,श्री. जाधव सर,पाडवी सर,शिखरे सर, अवताडे सर व श्री.गोसावी काका यांनी मोलाचे सहकार्य केले.
सर्व विद्यार्थ्यांनी शिस्त पाळत ही क्षेत्रभेट यशस्वीरीत्या पूर्ण केली.


